ठाणे – ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने स्वताकडेच महापौर पद कायम राखण्याचा मान मिळवला आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार ज्योत्स्ना जसनाले यांनी शिवसेनेचे उमेदवार अनंत शिर्के यांचा 55 विरूद्ध 36 मतांनी पराभव केला. भाजपचेच हसमुख गेहलोत यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मार्लिन डिसा यांचा 56 विरूद्ध 35 मतांनी पराभव केला.
95 सदस्यांच्या महापालिकेतील या निवडणुकीच्यावेळी चार नगरसेवक गैरहजर राहिले. या महापालिकेत भाजपचे 62 नगरसेवक निवडून आले असून कॉंग्रेसचे 10 तर शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. एक नगरसेवक अपक्ष आहे. भाजपचे महापालिकेतील संख्याबळ 62 असले तरी त्यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 55 मतेच मिळाली आहेत.