सिडनी : महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला भारतीय संघाने विजयी सुरूवात केली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाचा पराभव करण्याचा पराक्रम भारतीय संघाने करून दाखवला. या विजयामध्ये भारताची फिरकी गोलंदाज पूनम यादवने महत्वाची भूमिका बजावली. चार षटकांमध्ये चार बळी घेत पूनमने आॅस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे पूनमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Magnificent spell of bowling from Poonam Yadav.. she can win the WC on her own for team India.. @T20WorldCup @ICC #AUSvIND
— Morne Morkel (@mornemorkel65) February 21, 2020
पूनमच्या या कामगिरीने प्रभावित होऊन पूनम एकटी भारताला विश्वचषक जिंकून देईल, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज माॅर्नी माॅर्केल याने व्यक्त केला आहे.
पूनमने आॅस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्यांचा संपूर्ण संघ ११५ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकत मालिकेची विजयी सुरूवात केली. पूनमला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पूनमच्या या कामगिरीवर जगभरातील क्रिकेट चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतानाच भारताच्या निवृत्त महिला क्रिकेटपटूंनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मिथाली राजनेही पूनमला अशी कामगिरी पुन्हा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.