मुंबई – “एबी आणि सीडी” या चित्रपटातून बिग बी. अमिताभ बच्चन मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
नुकतंच, आता ‘एबी आणि सीडी’ चित्रपटाचा ऑफिशल टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मराठी चित्रपटातून प्रथमच विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चनही ही जोडी एकत्र दिसून येणार आहे.
चित्रपटाच्या टीजर मध्ये वृद्धत्वानंतर येणारे अनुभव दाखविण्यात आले आहे. तसेच विक्रम गोखले यांना आवाज देणारा अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो.
टीजर वरुन अमिताभ हे विक्रम गोखले यांचे विद्यार्थी दाखवले आहेत असे दिसते आणि खूप वर्षांनतर या दोघांची भेट होणार आहे हेही कळतय. मात्र ही भेट होणार की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना येत्या 13 मार्च ला चित्रपट गृहात जावे लागणार आहे.
मिलिंद लेले यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अक्षय बरदापूरकर, अभयानंद सिंह, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोद आणि पीयूष सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.