कॅनबेरा : हीथर नाइट हिच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात थायलंडवर ९८ धावांनी विजय मिळवला. हीथर नाइट सामन्याची मानकरी ठरली.
A maiden T20I hundred from Heather Knight and a superb bowling performance power England to a 98-run victory over Thailand 👏
They get their first win of this #T20WorldCup ✔️#ENGvTHA 📝 https://t.co/LX74kGIKsk pic.twitter.com/9lq8otiphu
— T20 World Cup (@T20WorldCup) February 26, 2020
विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करताना थायलंड संघास २० षटकांत ७ बाद ७८ धावाच काढता आल्या. थायलंडकडून नट्टाकन चंतम हिने सर्वाधिक ३२(५३), नरूएमोल चैवईने १९(२३) आणि कोनचरोएनकाई हिने १२(२१) धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आन्या श्रबसोल हिने ४ षटकात २१ धावा देत सर्वाधिक ३ तर नेटली स्कीवरने २ षटकात ५ धावा देत २ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १७६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून फलंदाजीत नेटली स्कीवरने नाबाद ५९(५२) तर हीथर नाइटने नाबाद १०८(६६) धावांची खेळी केली. इंग्लंडच्या सलामीवीर एमी जोन्स आणि डेनिले वाईट शून्यावर बाद झाल्या. थायलंडकडून नटाया बूचाथम आणि सोराया लातेह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.