T20 World Cup | स्पर्धा आयोजनाची पाकची तयारी

कराची :- टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा भारताऐवजी अमिरातीत होणार आहे. करोनाचा धोका कायम असल्यामुळे पुढील काळात भारतात जर स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, तर त्याचे आयोजन करण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दर्शवली आहे. 

त्यासाठी त्यांनी आयसीसीशी संपर्कदेखील साधला आहे. पाक मंडळाने 2024 ते 2031 या कालावधीत आयसीसीच्या सहा स्पर्धा आयोजित करण्याची तयारी केली आहे. 

2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, 2026 आणि 2028 मध्ये टी-20 विश्‍वकरंडक आणि 2027 आणि 2031 मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी केली आहे. 

आयसीसीने गेल्या महिन्यात आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सविस्तर योजना आखल्या असल्याचे जाहीर केले. यामध्ये आठ जागतिक स्पर्धांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.