लाखणगाव -आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वीटकॉर्न मक्याला 10 ते 15 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे. तर मॉलसाठी संकलन करणाऱ्या केंद्रामध्ये पाच ते सहा रुपये प्रति कणीस या दराने स्वीटकॉर्नची विक्री होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुकामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्वीटकॉर्न मक्याचे उत्पादन घेतले जाते. देशभरात संचारबंदी लागू असल्याने तरकारी पीके घेण्याकडे शेतकऱ्यांच्या कल कमी झाला. परिणामी अनेक तरकारी पिके शेतकऱ्यांनी घेतली नाहीत. स्वीटकॉर्न मकेची लागवड यंदा कमी प्रमाणात झाली. स्वीटकॉर्न मक्याचे उत्पादन कमी असून तरकारी पिकांचे बाजारभाव वाढले आहे.
स्वीटकॉर्न मकेला 10 ते 15 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. कणसे विक्रीसाठी तर मक्याची ताटे ही जनावरांसाठी चारा म्हणून वापरली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वीटकॉर्न मका उत्पादित केली जाते. परंतु संचारबंदीमुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी स्वीटकॉर्न मकेची लागवड केली नाही. त्यामुळे स्वीटकॉर्न मकेचे उत्पादन कमी होत आहे.