चिंबळी – मोई (ता. खेड) गावतील ग्रामस्थ कायम निरोगी व सुदृढ रहावे यासाठी सरपंच राहुल गवारी यांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. गावात व परिसरा स्वच्छतेची प्रत्येकाला सवय लागावी यासाठी मोई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंद्रायणी माध्यमिक विद्यालय व अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना दिली स्वच्छतेची “शपथ’ देण्यात आली.
तसेच सदृढ आरोग्यासाठी आपल्या आयुष्यात स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे सरपंच गवारी यांनी विद्यार्थ्यांना पटऊन सांगितले. तसेच घरच्यांनाही याबाबत जागृत करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेत आनोखी आदरांजी अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच पल्लवी गवारी, निर्मला कवडे, सारिका गवारी, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, आनंद गवारी, रवी गवारी, मारुती येळवंडे, देवीदास मेदनकर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, इंद्रायणी माध्यमिक महाविद्यालयाच्या वतीने सरपंच राहुल गवारी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.