उपोषणाला बसलेल्या स्वाती मालीवाल यांची प्रकती बिघडली

बलात्काऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण

नवी दिल्ली : देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमधील आरोपींना अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फासावर लटकवण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. रविवारी पहाटे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


यापूर्वी कालच डॉक्‍टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच, उपोषण संपुष्टात न आल्यास मूत्रपिंडाला नुकसान पोहोचू शकते, असेही डॉक्‍टरांनी सांगितले होते. पण त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास प्रकृत अधिक बिघडल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

त्याआधी शनिवारीच मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संपूर्ण देशात दिशा विधेयक तातडीने लागून करपण्याची मागणी केली होती. तसंच महिला सुरक्षेबाबत केंद्राच्या उदासीन भूमिकाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती. हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीवर अत्याचार करून जाळून टाकण्याच्या घटनेनंतर स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात डिसेंबरपासून उपोषण सुरू होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.