सलमानच्या घरात दोन तासांत होणार बॉम्बस्फोट

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान राहत असलेल्या घरी म्हणजेच, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार “गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्ब असल्याचा एक ईमेल आला आणि एकच खळबळ माजली…2 तासांत बॉम्बस्फोट होणार….थांबता येत असेल तर थांबवा”. असे या ईमेल मध्ये लिहिले होते. मात्र, हा ईमेल मिळताच मुंबई

दरम्यान, 4 डिसेंबरला मुंबई पोलिसांना ही खबर मिळाली आणि मोठी खळबळ माजली. हा सर्व प्रकार लक्षात घेता पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तात्काळ सलमानच्या ‘गॅलेक्सी’ घराकडे धाव घेतली. यावेळी सलमान खान त्याच्या घरी नव्हता. परंतु, यावेळी सलमानचे आई-वडील आणि बहिणी गॅलक्सीमध्ये उपस्थित होते.

पोलिसांनी ताबडतोब या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने गॅलक्सीमध्ये तब्ब्ल 4 तास बॉम्बचा शोध घेतला. परंतु, कोठेही बॉम्ब आढळला नाही. त्यानंतर पुन्हा सर्व कुटुंबियांना गॅलेक्सी येथील निवासस्थानी आणले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.