आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ८ बाद २१७ वर घोषित
पर्थ : आॅस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात दुसरा डाव ९ बाद २१७ धावांवर घोषित केला असून न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४६८ धावांचे आव्हान ठेवले आहे. याआधी आॅस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४१६ धावा करत न्यूझीलंडला पहिल्या डावात १६६ धावांत गुंडाळत २५० धावाची आघडी घेतली होती.
Australia declare on 217/9 with a lead of 467!
Tim Southee dismisses Mitchell Starc on 23 to get his ninth five-wicket haul in Tests. How will the visitors fare with the bat?#AUSvNZ SCORECARD 👉 https://t.co/lywZNrst6O pic.twitter.com/9sjygzj3vg
— ICC (@ICC) December 15, 2019
न्यूझीलंडचा संघ दुस-या डावात फलंदाजीस मैदानावर उतरला असून शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा ४६८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची १२ षटकात २ बाद ३१ अशी अवस्था झाली आहे. जीत रावल १ आणि विलियमसन १४ धावांवर माघारी परतले आहेत. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि नाथन लायनने १ गडी बाद केला आहे. न्यूझीलंडला विजयासाठी अजूनही ४३७ धावांची आवश्यकता आहे. सध्या खेळपट्टीवर टाॅम लाथम १० आणि राॅस टेलर ५ धावावर खेळत आहेत.
https://twitter.com/ICC/status/1206110415480078336?ref_src=twcamp%5Ecopy%7Ctwsrc%5Eandroid%7Ctwgr%5Ecopy%7Ctwcon%5E7090%7Ctwterm%5E3
आॅस्ट्रेलियाकडून फलंदाजीत जो बर्न्सने ५३,मार्नस लबुशेनने ५० आणि मिशेल स्टार्कने २३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत दुस-या डावात टिम साउदीने २१.१ षटकात ६९ धावा देत सर्वाधिक ५ तर नील वैगनरने ५९ धावात ३ गडी बाद केले.