सुष्मिता सेनची मुलगी रिनी आता मोठी झाली आहे. एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवातदेखील केली आहे. लवकरच ती बॉलीवूडमध्येही पदार्पण करणार आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर ती सतत ऍक्टिव्ह असते. तिचे फॅन फॉलोअर्स देखील खूप आहेत. तिने आपल्या फॅन्सबरोबर “आस्क मी एनिथींग’ नावाच्या एका “ऑनलाईन चॅट’ शो मध्ये आपल्या लव्ह लाईफबद्दलही बरीच माहिती दिली आहे. तिने असे उत्तर दिले की विचारणाऱ्यांची बोलतीच बंद झाली.
View this post on Instagram
एकाने तिला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारले. त्यावर रिनीने आपण कामावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. एकाने एक्स बॉयफ्रेंडबद्दल विचारले असता, त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, असे रिनी म्हणाली. भविष्यातील बॉयफ्रेंडच्या शोधासाठी आपल्याला प्रवास करावा लागेल, असेही तिने सांगितले.
View this post on Instagram
सध्या आपण एका नव्या प्रोजेक्टच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी असल्याचेही तिने सांगितले. “सुट्टाबाजी’ सिनेमातून तिने ऍक्टिंगची सुरुवात केली आहे. आपल्याला आईमुळे ऍक्टिंगचा वारसा मिळाला आहे, हे तिला मान्य आहे. पण जर काम प्रामाणिकपणे केले नाही, तर ते योग्य होणार नाही. आईच्या वशिल्यामुळे काम मिळवणे तिला पसंत नाही. आपले काम आपल्याला चांगले यायलाच पाहिजे, असे ती मानते.