बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन अखेर विविह बंधनात अडकला आहे.गोवा येथे होणा-या आपल्या डेस्टिनेशन वेडिंगपूर्वी त्याने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारु असोपासोबत शुक्रवारी मुंबईत कोर्ट मॅरेज केले आहे. या जोडीचो 16 जून रोजी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार आहे.
राजीव आणि चारू यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर कोर्ट मॅरेजची फोटो शेअर केली आहेत. याप्रसंगी राजीव यानं पांढ-या रंगाचा कुर्ता-पायजाम, तर चारुने लाल रंगाची साडी परिधान केलेली होती. या लग्नाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माउंट मेरी चर्च आणि सिद्धिविनायक मंदिरात जावून आशीर्वाद घेतले. हे फोटो शेअर करताना राजीवने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की, “मी राजीव सेन, चारु असोपाला कायद्याने माझी बायको म्हणून स्वीकारत आहे.’
आता त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचा शुभारंभ 14 जून रोजी होणाऱ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर मेंहदी आणि संगीताचा कार्यक्रम 15 जूर रोजी, तर 16 जून रोजी धार्मिक पद्धतीने दोघेही विविहबंधनात अडकणार आहेत. हा विविह सोहळा बंगाली आणि राजस्थानी पद्धतीने होणार आहे.