नवी दिल्ली – सागर धनखडच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेला दोन ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारची आता दिल्ली पोलिसांनी चांगलीच कोंडी केली आहे. त्याच्यावर मोक्कासह आणखीही काही गुन्हे नोंदवले जाणार असून, त्याचा शस्त्र परवानाही रद्द करण्यात येणार आहे.
युवा कुस्तीपटू सागरच्या मृत्यू प्रकरणात सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर सुशील कुमारला रेल्वेमधील नोकरी गमवावी लागली असून, आता त्याच्या अडचणींत जास्त वाढ होणार आहे.
सुशील कुमारने 2012 साली शस्त्र परवाना मिळवला होता. आता या विभागाने हा परवाना रद्द करत असल्याची नोटीस सुशील कुमारच्या घरी पाठवली आहे. सुशील कुमारला या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुशील कुमारचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काही जणांकडे पिस्तूलही होती. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार यावेळी सागरला कशी भयंकर मारहाण करत आहेत. या व्हिडिओमध्ये काही लोकांच्या हातामध्ये बंदूक असल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर सुशील कुमार सागरला यावेळी काठीने मारहाण करत असल्याचेही दिसत आहे. सुशील कुमारला यावेळी काही जणांनी थांबवण्याचाही प्रयत्न केला होता. पण सुशील कुमार सागरला मारहाण करत राहिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सुशील कुमारचे साथीदार यावेळी काठी आणि लाथाने या मुलांना मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रसाल स्टेडियमच्या बाहेरील पार्किंगच्या ठिकाणी ही गोष्ट घडली आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी यावेळी सागर आणि त्याच्या मित्रांना यावेळी मारहाण करण्यात आली. सुशील कुमारबरोबर यावेळी काही कुख्यात गुन्हेगारही असल्याचेही म्हटले जात आहे.
सुशील कुमारच्या सांगण्यावरूनच त्याच्या एका मित्राने हा व्हिडिओ बनवला होता. अन्य कुस्तीपटूंमध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. हा व्हिडिओ पोलिसांसाठी एक मोठा पुरावा आहे. हा व्हिडिओ पोलिसांनी न्यायालयात सादरही केला आहे.