बॉलीवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे. सुशांतच्या आत्महत्येने बॉलीवूड निर्माता विजय शेखर गुप्तालाही अशा प्रकारे धक्का बसला आहे की त्याने सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर “सुसाइड ऑर मर्डर?’ हा चित्रपट साकारणार आहेत.
विजय शेखर गुप्ता यांनी त्यांच्या चित्रपटाचे पोस्टरही प्रसिद्ध केले आहे. याबाबत विजय म्हणतो, “हा चित्रपट मी मुंबई चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्स आणि प्रोडक्शन हाऊसेसची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी बनवित आहे.’ विजय म्हणाला, माझ्या या चित्रपटाच्या माध्यमातून मी बॉलीवूडला 100% उघडे करणार आहे. देशभरातून येथे अनेक मुले येतात. पण या युवकांना योग्य संधी मिळत नाही.
कारण बॉलीवूडमध्ये गॅंग बनल्यामुळे मला ही टोळी मोडायची आहे. माझ्या या कथेत ते सर्वकाही असणार आहे, जे सुशांतसोबत चुकीचे घडले. त्या मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, सर्वांनी एकत्रितपणे त्याचा बळी दिला. त्याच्यावर बहिष्कार टाकत एकापाठोपाठ एका चित्रपटातून त्याला काढून टाकण्यात आले. दरम्यान, मी या चित्रपटाविषयी माझ्या लीगल टीमशी चर्चा केली आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये. आम्ही ती बायॉपिकसारखे बनवित नसून ती सुशांतच्या जीवनापासून प्रेरित असेल. यात बॉलीवूडमधील अनेक सत्य उघड होतील, असे गुप्ताने सांगितले.