मंचर – मुंबई, पुणे व इतर करोनाबाधित क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्यात दाखल होत आहेत. त्यामुळे करोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याअनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील 49 हजार 268 कुटुंबातील 2 लाख 27 हजार 58 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी दीड हजार कर्मचारी तैनात होते.