आंबेठाण -देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढताना आहे असे असताना प्रशासन व पोलीस मोठ्या हिमतीने परिस्थितीचा सामना करत आहेत. ज्या हातांनी कठोर शिक्षा दिल्या त्याच हातांनी गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देताना आपण पोलिसांना पाहत आहोत.
त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या पोलीस यंत्रणेला आपण “साथ देऊ या आणि करोनाला हरवूया’. महाळुंगे इंगळे येथील पोलिसांनी तर रस्त्यावर उतरून वाड्या-वस्त्यांवर फिरून कोणी उपाशी तर नाही ना आणि कोणी उपाशी असेल तर त्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप करून माणुसकीचे दर्शन करून दिले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी योग्य ती पावले पोलिसांना उचलावी लागतात. दिवसभर उन्हातानात फिरून स्वतःची कुटुंबाची परवा न करता आपल्यासाठी पोलीस यंत्रणा राबते आहे, आपण सुरक्षित राहावे घराबाहेर पडू नये असा वारंवार पोलिसांकडून सल्ला आपणास देण्यात येत आहे; परंतु आपल्यातील काही समाजकंटक फेरफटका म्हणून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
महाळुंगे परिसरातील अनेकांना आतापर्यंत पोलिसांनी मदत म्हणून अन्नधान्य पुरवणे जेवण पुरवणे त्यांना गावी जाण्यापासून रोखणे बाजारातील गर्दी रोखणे जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अत्यावश्यक पास पुरवणे कायदा – सुव्यवस्था राखणे ही आव्हाने पार पाडताना दिसत आहेत. पोलिसांकडून पुरवण्यात येत आहे.