Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे खास करून ओळखली जाते. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता सनी एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सनी लिओनी ‘ग्लॅम फेम’ (Glam Fame Show) या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशभरातील महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना प्रेरणा देणारा आगामी रिअॅलिटी शो ‘ग्लॅम फेम’ मध्ये सनी लिओनी जजची भूमिका बजावणार आहे.
या रियालिटी शोमध्ये नील नितीन मुकेश, ईशा गुप्तासोबत अभिनेत्री सनी लिओनी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी लिओनीने सांगितले की, “मॉडेलला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शोमधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि यासाठी मी खूपच उत्सुक आहे. हे व्यासपीठ तरुण वर्गाला स्फूर्ती देणारा आहे.”
व्हॉटवर प्रॉडक्शन आणि कृष्णा कुंज प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला ‘ग्लॅम फेम’ लवकरच जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. ‘ग्लॅम फेम’ सीझन एकमध्ये साधारण 10 ते 12 एपिसोड असणार आहेत. यात भारताच्या कानाकोपऱ्यातील इच्छुक उमेदवारांची डिजिटल स्क्रीनिंग प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. जे यशस्वी झाले त्यांचा एक रोमांचक प्रवास यात दाखवला जाणार आहे.
ज्यामध्ये 12 मोठ्या शहरांमध्ये वैयक्तिक मुलाखती आणि ग्रुप चर्चा आयोजित केल्या जाणार आहे. त्यानंतर यामधूनच या शोसाठीचे स्पर्धक निवडले जातील.