Entertainment – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. पण एक वेळ अशीही आली जेव्हा त्यांना कामासाठी खूप संघर्ष करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीत नवाजुद्दीने सांगितले की, ‘अनेक वर्षांपासून मला वाटत होते की मी काळा दिसत असून मी चांगला दिसत नाही. मात्र काही वर्षानंतर माझा खूप आत्मविश्वास वाढला. आणि त्यानंतर मला समजले कि दिसणे महत्वाचे नसते तर, तुमचा आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे असते.’ असेही त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
नवाजुद्दीनने त्याच्या लूक्सबद्दल सांगितले की,’मी फेअरनेस क्रीमच्या फंदातही पडलो. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही. माझ्या रंगामुळे करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला असुरक्षित वाटायचे. मी खूप क्रीम लावले पण फरक पडला नाही. नंतर मला समजले की याचा काहीही उपयोग होणार नाही.’
माझ्या आजूबाजूचे लोक मला चांगला दिसणारा व्यक्ती मानत नसल्यामुळे, मलाही आपण चांगले दिसत नाही असे वाटू लागले. पण नंतर मी त्या विचारापासून स्वतःला दूर केले, मी बराच काळ विश्वास ठेवत होतो की मी सुंदर दिसणारा माणूस नाही. पण जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा मला समजले की मी ठीक आहे, माझा चेहरा ठीक आहे.” दरम्यान, नवाजुद्दीनने करिअरच्या सुरुवातीला अनेक छोट्या-छोट्या भूमिका केल्या.
नवाजुद्दीन वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच भूमी पेडणेकरसोबत ‘अफवाह’ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे कंगना राणौतचा ‘टिकू वेड्स शेरू’ देखील आहे.