Bollywood : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2001 साली प्रदर्शित झालेल्या गदरच्या सिक्वेलसाठी प्रेक्षकांना तब्बल 22 वर्ष वाट पाहावी लागली. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात देखील तारा सिंह आणि सकिनाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ‘गदर 2’ यशस्वी झाल्यानंतर अनेकांनी गदर 3 पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सनी देओलची जादू पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळू शकते. या सिनेमाचा तिसरा भाग निर्माते दिग्दर्शक करु शकतात, आणि लवकरच त्यावर काम सुरू करु शकतात. मिडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाचे बॅकड्रॉप बनारसमध्ये शूट करण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासूनच गदर 3 चे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग 14 ते 15 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. ‘गदर-3’ ची अधिकृत घोषणा 2024 मध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये त्याचे शूटिंगही सुरू होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढच्या भागाच्या कथेची त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. येत्या दोन वर्षात हा सिनेमा पडद्यावर येण्याची शक्यता आहे. तारा आणि सकिनाची कथा गदर आणि गदर 2 मध्ये दाखवण्यात आली होती तर गदर 2 मध्ये प्रेक्षकांना उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौरची प्रेम कहानी पहायला मिळाली. त्यामुळे आता ‘गदर-3’ मध्ये या दोघांचीच स्टोरी पुढे चालणार आहे. मनीष वाधवाचा मुलगा खलनायक बनुन आता पुढच्या भागात आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, ‘गदर 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 526 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच ‘गदर 2’ने (Gadar 2)आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात येणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत तब्बल 300 कोटींचा गल्ला जमावला असून, या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या 2023 या वर्षातील टॉप 5 चित्रपटांमध्ये ‘गदर 2’चा समावेश आहे.