Sunny Deol : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. मोठ्या ब्रेकअपनंतर पुनरागमन केलेल्या सनी देओलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटानंतर आता सनी देओल ‘लाहोर 1947’ या चित्रपटात दिसणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या सनीच्या या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता अभिमन्यू सिंह दिसणार आहे.
दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले, “जेव्हा आपण खलनायकाच्या व्यक्तिरेखेचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी अमरीश पुरी आणि डॅनी यांची नावे येते. पण, आता यापुढे ही खलनायकी भूमिका कोण साकारू शकतात, हे पाहिले पाहिजे. अभिमन्यू सिंह हा लाहोर 1947 मध्ये एक जबरदस्त खलनायकी भूमिका साकारेल. त्याचा आवाज, दृढ विश्वास कमालीचा आहे. तो नक्कीच आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असल्याचे संतोषी यांनी म्हटले.
अभिमन्यू सिंग प्रामुख्याने हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम करतो. लक्ष्य, ढोल, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, राम-लीला, बच्चन पांडे, किसी का भाई किसी की जान आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्याने नेहमीच आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे आणि आता लाहोर 1947 मध्ये त्याला खलनायकाच्या भूमिकेत पाहणे हा नक्कीच एक चांगला अनुभव असेल.
प्रीती झिंटा आणि सनी देओल एकत्र
आमिर खान त्याच्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे, तर दिग्दर्शक राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी यापूर्वी ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. लाहोर 1947 चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर प्रीती झिंटा ही रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.