Bollywood । अभिनेता सनी देओलने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. गेल्या वर्षी ‘गदर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. सनी देओल अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. सनी देओल फिटनेस राखण्यासाठी लंडनहून दुधाचे बॉक्स मागवाच्या असा खुलासा विंदू दारा सिंग याने केला आहे.
विंदू दारा सिंग आणि सनी देओल खूप चांगले मित्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विंदू दारा सिंहने सनी देओलचा उल्लेख केला आहे. त्याने सांगितले की, त्याचे आणि सनी देओलचे वडील देखील खास मित्र आहेत. सनी आणि विंदू दोघांनाही बॉडी बिल्डिंगची खूप आवड आहे.
Bollywood । विंदू दारा सिंह यांनी काय सांगितले?
विंदू दारा सिंहने सांगितले की, तो (विंदू) आणि सनी दोघेही अनेकदा एकत्र व्यायाम करायचे. विंदूने यासंबंधीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. ‘सनी त्याच्या डेब्यू फिल्म ‘बेताब’च्या सुमारे 2-4 महिन्यांपूर्वी लंडनमध्ये खूप व्यायाम करत होता. यावेळी त्याचे शरीर जॉन जे रॅम्बोसारखे झाले होते. नंतर त्याच्या लक्षात आले की, अशी बॉडी सांभाळणे कठीण आहे आणि त्यासाठी त्याला काहीतरी वेगळे करावे लागेल.’
विंदू दारा सिंह म्हणाला, “सनीने लंडनमध्ये बरीच मसल बॉडी तयार केली. मी त्याला सांगितले की ही लंडनची बॉडी आहे, जी दूध, पनीर आणि चीज खाऊन बनते. भारतात गेल्यावर त्याची मसल बॉडी कमी होणार आणि नेमके तेच झाले. यानंतर सनी खूप दुःखी झाला.
Bollywood ।खोली दुधाच्या डब्यांनी भरलेली होती
विंदू दारा सिंहने पुढे सांगितले की, ‘पुढील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनीने त्याला सांगितले की, यावेळी माझे मसल कमी होणार नाहीत. हे ऐकून विंदूने त्याला विचारले की हे असे कसे? यानंतर तो त्याला एका खोलीत घेऊन गेला. ही खोली लंडनहून आलेल्या दुधाच्या डब्यांनी भरलेली होती.’ हे पाहून विंदू हसायला लागला.