Kerala Ernakulam Blast : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सलग भीषण स्फोट झाला आहे. दरम्यान, हा संशयित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात आता पर्यंत एकाच मृत्यू झाला असून किमान 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
यहोवाच्या साक्षीदारांच्या परिषदेदरम्यान हा स्फोट झाला आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार तीन स्फोट झाले. या स्फोटानंतर मुंबई आणि पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच एनआयए आणि एनएसजीला घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान , प्राथमिक अंदाजानुसार हा दहशतवादी हल्ला आहे. बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. थ्रिक्काकारा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बेबी पीव्ही यांनी न्यूज18 ला पुष्टी केली की या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे आणि 20-25 जण जखमी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, 5-10 सेकंदात दोन स्फोट झाले.