Sunita Kejriwal Delhi CM: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांची भेट घेतली आहे. यादरम्यान सुनीता केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र आमदारांनी या चर्चांचे खंडन केले आहे. अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहणार असून ते तुरुंगातून सरकार चालवतील असे सांगितले.
दिल्लीतील २ कोटी जनता केजरीवालांसोबत –
सुनीता केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर आप आमदारांनी सांगितले की, दिल्लीतील २ कोटी जनता अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे. त्यांनी कोणत्याही किंमतीत राजीनामा देऊ नये आणि तुरुंगातूनच सरकार चालवावे.
‘भाजपला मुख्यमंत्रीपद देणार नाही’ –
आमदारांच्या बैठकीवर सौरभ भारद्वाज म्हणाले की, सर्व आमदारांना सुनीता केजरीवाल यांना भेटायचे होते. आज त्यांना वेळ मिळाला म्हणून ते भेटायला आले. त्याचवेळी, मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या अटकळांवर ते म्हणाले की, भाजपला वाटते की आपण त्यांना (भाजपला) मुख्यमंत्रीपद द्यावे पण आम्ही त्यांना देणार नाही.
#WATCH | Delhi: On speculations around Sunita Kejriwal and Delhi CM post, AAP leader Saurabh Bharadwaj says, “BJP thinks that we should give the CM seat to them. We will not give it to them… They might be anxious, but things will go on like this.” pic.twitter.com/yvsG69jBsc
— ANI (@ANI) April 2, 2024
भाजपने सभेवर निशाणा साधला –
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम आदमी पक्षात घटनात्मक नैतिकता उरलेली नाही. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून सरकार चालवायचे आहे. खुर्चीचे आकर्षण त्यांना सोडवत नाही. भाटिया म्हणाले की, केजरीवाल प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात गेले आणि म्हणाले की ईडीकडून 9 समन्स आले आहेत, ते थांबवावेत आणि त्यांना अटक करू नये. फायली पाहिल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, दारू घोटाळ्यात जर कोणी आरोपी असेल तर ते तुम्हीच आहात. त्याचवेळी त्यांना (विरोधक नेत्यांना) अटक झाली की लोकशाही संपत असल्याचे ते म्हणतात, पण न्यायालये आणि जनता भ्रष्टाचार संपत असल्याचे सांगतात.
#WATCH | BJP leader Gaurav Bhatia says, “…Arvind Kejriwal first went to the Delhi High Court and said that 9 summons have come from ED, they should be stopped and he should not be arrested. The High Court said, after seeing the files, that if there is anyone accused in the… pic.twitter.com/SHhWTg9FHq
— ANI (@ANI) April 2, 2024
55 आमदार मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले –
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या नेत्यांमध्ये आतिशी, सौरभ भारद्वाज, दिलीप पांडे, गोपाल राय, दुर्गेश पाठक, बीएस जून आणि इम्रान हुसेन यांचा समावेश आहे. एकूण 55 आमदारांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली विधानसभेत आपचे एकूण 62 आमदार आहेत, त्यापैकी 3 तुरुंगात आहेत, तर 4 काही कामासाठी दिल्लीबाहेर गेले आहेत.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी 15 दिवसांसाठी तिहार तुरुंगात आहेत. आज मंगळवार (दि. 2) तिहार तुरुंगातील त्यांचा दुसरा दिवस आहे.