IPL 2024 ( MIvsRR Match 14) : मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक; कर्णधार हार्दिक पंड्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद….

IPL 2024 ( MIvsRR ), unwanted record name of captain Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवासह हार्दिक हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पहिले तीन सामने गमावणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. या बाबतीत त्याने आपल्या कर्णधारपदाखाली पहिले तीन सामने गमावलेल्या हरभजन सिंगशी बरोबरी केली आहे.
हार्दिक मुंबईपूर्वी गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवत असे आणि या काळात त्याचा कार्यकाळ खूप यशस्वी होता. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला विजय मिळवून दिला, तर गेल्या मोसमात हा संघ उपविजेता ठरला. हार्दिक गुजरातचा कर्णधार झाला तेव्हा संघाने सलग तीन सामने जिंकले, पण मुंबईसाठी त्याची कामगिरी याच्या उलट झाली आहे. या हंगामात संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे .राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईचा घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर 6 गडी राखून पराभव झाला. तत्पूर्वी, मुंबईचा गुजरात टायटन्सकडून सहा धावांनी पराभव झाला होता, तर संघाचा सनरायझर्स हैदराबादकडून 31 धावांनी पराभव झाला होता.
हरभजन सिंगशी साधली बरोबरी….
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात हरभजनने मुंबईची कमान सांभाळली आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्या मोसमात, मुंबईचा आरसीबीने पाच गडी राखून पराभव केला होता, तर चेन्नई सुपर किंग्जने सहा धावांनी आणि पंजाब किंग्जने 66 धावांनी पराभव केला होता.
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार ‘रोहित शर्मा’च्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद…
दरम्यान, आतापर्यंत हार्दिकचे कर्णधारपद एमआयसाठी अपयशी ठरले आहे. हार्दिक कर्णधार होण्याआधीच चाहते संतापले होते आणि आता संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यात अधिकच भर पडली आहे.





