IND vs ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 7 मार्चपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळतील. या सामन्यासाठी दोन्ही संघ धर्मशाला येथे पोहोचले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खूप खास असणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर रोहित विशेष यादीत अनुभवी सुनील गावस्करला मागे सोडू शकतो.
धर्मशालामध्ये रोहित रचणार इतिहास…
टीम इंडियाने या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका 4-1 ने जिंकण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सुनील गावसकर ( Sunil Gavaskar ) यांना मागे टाकेल.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा सध्या सुनील गावस्करच्या बरोबरीने आहे. सुनील गावस्कर आणि रोहित शर्मा यांनी कर्णधार म्हणून भारतासाठी आतापर्यंत 9-9 कसोटी सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत आता या यादीत सुनील गावसकर यांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी रोहित शर्माकडे आहे.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकणारे कर्णधार…
विराट कोहली- 40 विजय
एमएस धोनी- 27 विजय
सौरव गांगुली- 21 विजय
मोहम्मद अजहरुद्दीन-14 विजय
सुनील गावस्कर- 9 विजय
रोहित शर्मा- 9 विजय