औरंगाबाद – महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीत एक छोटे धातू पॉलिशिंगचे युनिट चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने जीएसटी भरण्यास पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. विष्णु रामभाऊ कलवणे असे या इसमाचे नाव आहे. ते 53 वर्षांचे होते.
या भागातील पंढरपुर भागात ते राहतात. मंगळावारी रात्री घरातच पंख्याला गळफास लाऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आपण जीएसटी भरू शकलो नाही म्हणून आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
त्यांनी जीएसटी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. पण ती त्यांना मिळाली नाही म्हणून हताश झालेल्या कलवणे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.