शाहरुख खानची लाडकी बेटी सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्य अभिनयाचा अभ्यास करते आहे. आपल्या करिअरबाबतचे अपडेट ती सारखी सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. नुकतेच न्यूयॉर्कमध्ये आपल्या मित्रांसोबत मस्त वेळ घालवत असतानाचे फोटो तिने सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. त्याशिवाय सुहानाची शॉर्ट फिल्म “द ग्रेट पार्टस द ब्लू’ चा टिजर लॉन्च झाला आहे.
त्यामध्ये सुहानाचा निरागसपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसला आहे. तथापि, या टिजरमध्ये मॅजिकशिवाय अन्य काहीच नाही. परंतु स्वतःला प्रकाशझोतात आणण्याची कोणतीही अपेक्षा नसल्यामुळे सुहानाने या शॉर्टफिल्ममध्ये स्वत: ला झोकून दिले आहे.
सुहाना खानला डान्स करणे खूप आवडते आहे. तिने वोग मॅगेझीनच्या मुखपृष्ठावरील फोटोसेशनच्या वेळी डान्सचे फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोसेशनलाही खूप पसंती मिळाली होती.
आपल्याला आयुष्यभर डान्स करत रहायला आवडेल, असे सुहाना एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होती. तिच्या बॉलिवूड पदार्पणाला करण जोहर मदत करणार आहे, असे ऐकले आहे. पण न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय सुहानाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करू द्यायचे नाही, असे शाहरुख खानने ठरवले आहे.