मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्सला धक्का बसला असून आयपीएल पदार्पणातच विक्रमी कामगिरी करणारा मुंबईचा गोलंदाज अल्झारी जोसेफ दुखापतग्रस्त झाला असून तो उर्वरीत आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता बळावली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्झारीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. चेंडू अडवताना अल्झारीने डाईव्ह मारली आणि त्यातत्याच्या उजव्या हाताला मार लागला.
पदार्पणाच्या सामन्यातच अल्झारीने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. दुखापतग्रस्त ऍडम मिल्नेच्या जागी बदली खेळाडू म्हणून अल्झारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला.
पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. तन्वीरने 2008 साली 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम 12 वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता.