Sudha Murty । सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी आज गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी त्यांना संसद भवनातील त्यांच्या चेंबरमध्ये शपथ दिली. यावेळी सभागृह नेते पियुष गोयल उपस्थित होते. तसेच सुधा मूर्ती यांचे पती एनआर नारायण मूर्ती देखील यावेळी उपस्थित होते.
#RajyaSabha Chairman Jagdeep Dhankhar administers oath to the newly elected Member Sudha Murty in the Parliament House@SmtSudhaMurty @VPIndia pic.twitter.com/dcpGgjW625
— DD India (@DDIndialive) March 14, 2024
इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि अनेक पुस्तकांच्या लेखिका सुधा मूर्ती (७३) यांची गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्यसभेवर नामांकन करण्यात आले.
कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधा मूर्ती यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, पद्मश्री (2006) आणि पद्मभूषण (2023) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सुधा मूर्ती या टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड (TELCO) या व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीमध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता होत्या. सुधा मूर्ती यांनी पती नारायण मूर्ती याना आपत्कालीन निधीतून Infosys सुरू करण्यासाठी 10,000 रुपये दिले, ज्याचे आज बाजार भांडवल US$80 अब्ज पेक्षा जास्त आहे. त्यांची मुलगी अक्षताचा विवाह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाला आहे.
हे वाचाल का ? ‘भाजपचा उमेदवारीमुळे …’ शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आरोप करत दिला राजीनामा