पुणे – देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना पुढील दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून सोडण्यात येईल, अशी माहिती ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने बुधवारी (ता. १३) अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना पुणे येथील भारती रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांना ताप व छातीमध्ये इन्फेक्शन झालं होत. आता ताप उतरला असून त्यांची प्रकृती स्थित आहे.
प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष असून त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं होतं.
Pratibhatai Patil Health Update