पुणे (प्रतिनिधी) – राज्यसभा खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्नीक श्री क्षेत्र जेजूरी येथे येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे ते अनेक विधीमध्ये सहभागी झाले.
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती हे दोघेही लग्नाच्या २५ व्या वाढदिवसा नंतर जेजुरी दर्शन साठी आले होते.