नवी दिल्ली : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. भारताने सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे.
India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha.
It can hit targets up to a range of 2000 kms, & is very short & light in comparison with other missiles in this class. A lot of new technologies incorporated in the new missile: DRDO officials pic.twitter.com/zq7ffypqFM
— ANI (@ANI) June 28, 2021
डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे.
अत्याधुनिक पद्धतीने मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचे वृत्त दिले आहे. यासंदर्भातील वृत्तसंस्थेने एक ट्विट केले आहे.