सध्या बॉबी देओल अॅनिमलमुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. प्रोफेशनल लाइफसोबतच बॉबी त्याच्या पर्सनल लाईफचाही खूप आनंद घेत आहे. बॉबी अनेकदा तान्यासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि त्याच्या लव्ह लाईफबाबत जाणून घेण्यास चाहतेही सोशल मीडियावर उत्सुक असतात. .
बॉबी देओल आणि तानिया देओल हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहे. एकमेकांवरील अपार प्रेमामुळे त्यांचे नाते काळाच्या ओघात अधिक घट्ट होत गेले. लग्नाला इतकी वर्षे होऊनही बॉबी आणि तान्या यांचे एकमेकांवरील प्रेम अतूट आहे.
तान्याच्या वाढदिवसानिमित्त बॉबीने आपल्या पत्नीला खास शुभेच्छा दिल्या, बॉबीने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेता आपल्या पत्नीला मिठी मारताना दिसत आहे. हा रोमँटिक फोटो शेअर करताना बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..’
रिपोर्टनुसार, बॉबी आणि तान्याची प्रेमकहाणी मुंबईतील हॉटेल प्रेसिडेंटमधील ट्रॅटोरिया या प्रसिद्ध इटालियन कॅफेमध्ये सुरू झाली. येथे मित्रांसोबत पार्टी करताना ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले. यानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. जसजसा त्यांनी एकत्र जास्त वेळ घालवला तसतसे त्यांचे नाते अधिकच घट्ट होत गेले. त्यानंतर दोघांनी 30 मे 1996 रोजी प्रेमविवाह केला. बॉबी आणि तान्या हे दोन मुलांचे पालक आहे.