ऑस्ट्रेलियात 88 व्हेल वाचवण्यात यश

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटाजवळ भरकटलेल्या व्हेलना पुन्हा समुद्रात सोडून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 88 व्हेलना जीवनदान देण्यात यश आले आहे.

या वाळूच्या बेटातल्या खाडीमध्ये आलेल्या तब्बल 500 व्हेलना वाचवण्यासाठी ही मोहिम चार दिवसांपूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र या बचाव कार्यादरम्यान 380 व्हेल वाळूच्या खाडीमध्ये अडकून मरण पावल्या आहेत.

या सर्व मृत व्हेलना टास्मानियाच्या चिंचोळ्या समुद्रकिनाऱ्यावरून हटवण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. वाळूवर अडकलेल्या 20 व्हेल अजूनही जिवंत असून त्यांना वाचवण्याची मोहिम अव्याहतपणे सुरू आहे, असे टास्मानिय पार्क्‍स ऍन्ड वाईल्डलाईफ सर्व्हिस मॅनेजर निक डेका यांनी सांगितले. 

सोमवारी टास्मानियाच्या किनाऱ्याजवळ वाळूजवळ आलेल्या व्हेलना पुन्हा समुद्रात सोडण्यासाठीची मोहिम उत्स्फूर्तपणे सुरू करण्यात आली. त्यामध्ये 50 पेक्षा अधिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेली ही मोहिम दिवसाचे 12 तास अव्याहतपणे सुरू आहे.

मृत व्हेल खोल समुद्रात नेऊन सोडून देण्यात येणार आहेत. हे मृत व्हेल लाटांबरोबर पुन्हा वहात किनाऱ्यावर येऊ नये, यासाठी अधिक काळजी घेतली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.