मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची काल चौकशी करत जबाब नोंदवून घेण्यात आला होता. ही चौकशी सुमारे तीन तास चालली.
I have asked Ishkaran to process Rajput alleged suicide matter for a possible CBI case or PIL or Criminal complaint case.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 9, 2020
यातच मिळालेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
या घटनेनंतर आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा जबाबही नोंदवला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांतच्या निधनानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआय तपासणीसाठी उचललेल्या पावलांसाठी त्यांची ट्विटरवर खूप प्रशंसा होत आहे. लोक सुब्रमण्यम स्वामी यांचे आभार मानत आहेत.