Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy : भारत सरकारने कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षित मायदेशी परतण्याची हमी दिली आहे. आधी या माजी नौसैनिकांची शिक्षा कमी करण्यात आली, नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, भाजप नेत्याने एक ट्विट करत हे सर्व मोदींनी नाही तर अभिनेता शाहरुख खानने केला असल्याचा सूतोवाच केला आहे. | Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy
Qatar Prime Minister HE Sheikh Mohammed bin Abdulrahman bin Jassim Al Thani welcomes Bollywood Superstar Shah Rukh Khan as he attends AFC Final in Doha as Special Guest of Honor.
World’s biggest star for a reason 🔥@iamsrk #Qatar #ShahRukhKhan #Doha #Bollywood #SRK… pic.twitter.com/f5JcsDDZk2— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) February 11, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, ते पुढील 2 दिवसांत UAE आणि कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांचा भाग असतील आणि भारताचे या दोन देशांसोबतचे द्विपक्षीय संबंधही दृढ होतील. PM मोदी म्हणाले की PM झाल्यानंतर UAE ची ही त्यांची 7 वी भेट असेल, जी भारत-UAE मैत्रीचे महत्व दर्शवते. यासाठी आपणही उत्साहित असल्याचे त्यांनी सांगितले. | Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy
मोदींच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अजिब दावा केला आहे. स्वामी यांनी एक ट्विट करत कतारबाबतचे श्रेय मोदींऐवजी शाहरुख खानाला देण्याचा हास्यास्पद विनोद केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात,”मोदींनी सिनेमा स्टार शाहरुख खानला घेऊन कतारला जावे. जेव्हा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) कतारच्या शेखांना पटवण्यात अयशस्वी ठरले तेव्हा मोदींनी शाहरुख खानला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आमच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कतारच्या शेखांसोबत हा खूप महागडा करार झाला.” | Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy
Modi should take Cinema star Sharuk Khan to Qatar with him since after MEA and NSA had failed to persuade the Shiekhs of Qatar, Modi pleaded with Khan to intervene , and thus got an expensive settlement from the Qatar Shiekhs to free our Naval officers.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 13, 2024
सुब्रमण्यम स्वामी यांच्या टोलेबाजीनंतर ही बाबा एवढी व्हायरल झाली कि शाहरुख खानची असिस्टन पूजा ददलानीने याबाबत एक पोस्ट शेअर करून खरी माहिती दिली. कतारमधील भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या प्रकरणाशी सुपरस्टार शाहरुख खानचा काहीही संबंध नसल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
View this post on Instagram