Narendra Modi – अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा चारही शंकरचार्यांच्या विरोधामुळे वादग्रस्त बनलेला असतानाच भाजपचेच नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘धार्मिक संकेतानुसार पंतप्रधान मोदी आपल्या पत्नी शिवाय अयोध्येतील पुजेला उपस्थित राहू शकत नाहीत’. त्यांच्या या विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्वामी यांनी आज ट्विटवर एक पोस्ट टाकून आपले हे म्हणणे मांडले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी औपचारीकपणे आपल्या पत्नीशिवाय या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाहीत. आपलेचारही महत्वाचे शंकरचार्य या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. मी स्वता मात्र रामनवमीच्या दिवशी एप्रिल महिन्यात अयोध्येत दर्शनाला जाणार आहे असेही स्वामी यांनी म्हटले आहे.
Since Modi without his wife cannot formally participate in six days of Prana Pratishtha Puja, and four of the revered
Scholars, the Shankaracharyas, will not be present on sixth day viz., Jan 22, I will instead participate on Sri Rama’s birthday prayers during Ram Navmi on April…— Subramanian Swamy (@Swamy39) January 16, 2024
काही धर्माचार्यांनी पुराणाचे दाखले देत या आधीच कोणतीही व्यक्ती त्याची पत्नी हयात असताना पत्नीशिवाय हिंदु धर्मातील कोणतेही अनुष्ठान करू शकत नाही असे विधान केले होते. त्याचाच धागा ओढून स्वामी यांनी हा विषय आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे.