कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान सामितीचे विद्यमान सदस्य सुभाष वोरा यांचे काल मध्यरात्री निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम ईच्छेनुसार त्यांच्या भगिनी आशा स्वामीसह भाचा दत्तक पुत्र विवेकने अग्निसंस्कार केले. शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी सांयकाळी पाच वाजता करवीर नगर वाचन मंदिर मघ्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
जनसंघापासून ते भाजपाच्या जिल्हा तसेच राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी प्रर्दीघ काळ काम केले होते. यासह कोल्हापूर महानगर पालिका स्थायी समिती सभापतीसह एस. टी. महामंडळाचे ही ते सदस्य होते. हिंदू व्यासपीठासह करवीर नगर, सेवा भारती आदी संघटनाचे ते सदस्य होते. खासदारपदाची निवडणूक ही त्यांनी लढवली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार अमल महाडीक, आमदार सतेज पाटील आदीसह विविध संस्थाचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.