व्हर्चुअल गणेश फेस्टिव्हल साजरा करणारे पाहिले मंडळ
बारामती (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पहिल्या बारामती गणेश फेस्टिव्हलच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाली.
गेली 18 वर्षे सलग सुरू असणाऱ्या गणेश फेस्टिव्हलला या वर्षी करोनाचे सावट असल्याने गणेश फेस्टिव्हल साधे पणाने साजरा करण्याचे संयोजन समितीने ठरविले आहे अशी माहिती मुख्य संयोजक किरण गुजर यांनी दिली.
परंतु बारामतीकरांना मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता यावे याकरिता संयोजन समितीच्या वतीने यावर्षी फेसबुकच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये दाखविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे पुनः प्रेक्षपण करण्यात येणार आहे. यामुळे बारामतीकरांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येणार आहेत. सध्या जगामध्ये सगळ्या गोष्टी व्हर्चुअल सुरू आहेत. त्यामुळे यावर्षीचा बारामती गणेश फेस्टिव्हल देखील व्हर्चुअल साजरा होणार आहे. व्हर्चुअल गणेश फेस्टिव्हल साजरा करणारे बारामती गणेश फेस्टिव्हल पहिले मंडळ ठरले आहे.
तसेच यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम संपूर्ण बारामतीमध्ये राबविणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.