बॉलीवूडमधील ऍक्शन स्टार टायगर श्रॉफ सुमारे पाच महिन्यांनंतर पुन्हा वापसी करणार आहे. टायगरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याच्या हातात ‘फेथ’ असे लिहिलेले दिसत आहे. या पोस्टसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वापस कामावर किप द फेथ.’ मात्र, त्याने सध्या कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे याबाबत खुलासा केला नाही.
View this post on Instagram
टायगरने काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तो वर्कआउट करताना आणि आपल्या बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तो अखेरच्या वेळी अहमद खानद्वारा दिग्दर्शित ‘बागी-3’ चित्रपटात झळकला होता.
View this post on Instagram
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु लॉकडाऊन झाल्याने अर्ध्यातूनच चित्रपटगृह बंद करण्यात आली.
View this post on Instagram
दरम्यान, टायगर श्रॉफच्या वॉर चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यात त्याच्यासोबत हृतिक रोशनने मुख्य भूमिका साकारली होती.