राहाता, (प्रतिनिधी)- अयोध्या येथे रामललाची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातून रामभक्त अयोध्याकडे रामललाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहे.
या येणाऱ्या रामभक्तांना प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक व व प्राचीन कला पाहण्यास मिळावी, यासाठी यूपी सरकारने प्रत्येक राज्यातील कला सादर करण्याचे ठरवले. त्यामध्ये महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन कला तलवारबाजी,दानपट्टा व लाठीकाठी इतर प्राचीन कला पाहण्यासाठी राहात्यातील कराटे प्रशिक्षक विजय मोगले यांच्या शिवशंभू मर्दानी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत मर्दानी खेळ दांडपट्टा ,लाठीकाठी, तलवारबाजी इत्यादी प्रशिक्षण शहरातील विद्यार्थ्यांना गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून दिले जाते. अनेकमहापुरुषांच्या जयंती व उत्सव कार्यक्रमांमध्ये मर्दानी खेळाचे कलाकार आपलं प्रत्यक्ष दाखवत असतात. तसेच सोशल मीडिया युट्युब ,फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यावर हे खेळ अपलोड केले जातात.
सादरीकरण केलेले व्हिडिओ शेअर केले जातात. राहाता येथील मर्दानी खेळाचे पथक यांची श्री राम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी लाठीकाठी,दानपट्ट्याच्या कार्यक्रम सादरीकरण करता निवड करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षक विजय अशोक मोगलेसह १४ विद्यार्थी येत्या १५ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. दि.१८,१९ व २० मार्च या ३ दिवसात अयोध्या यथील तुळशीबाग या ठिकाणी हा कार्यक्रम सादर होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी सुवर्णा मोगले, भावना निमसे, प्राची निमसे, वैभवी पुंड, सायली तलरेजा, प्रगती चोखर, आशिष प्रभुणे, सागर वाघे, साई निमसे, साहिल फुलडहाळे, हर्षल मोगले, अनंत मोगले, तन्मय तुपे, ध्रुव पटेल हे १४ विद्यार्थी अयोध्या येथे मर्दानी खेळ सादर करणार आहेत.