पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ॲड. मोरेश्वर शेडगे यांची प्रदेश कार्यकारणीवर बुधवारी (दि. १३) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेडगे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
मोरेश्वर शेडके यांनी २००२ पासून भाजप युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी, विद्यार्थी आघाडी अशा पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाची मिळालेली उमेदवारी स्थानिक नेतृत्वाने नाकारली. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड.मोरेश्वर शेडगे यांना निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केले.
आपल्या नियुक्तीबाबत बोलताना अड शेडगे म्हणाले की, पक्षाने माझयावर दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी आणलेल्या योजना व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोचवेल.