पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यात सूर्यदत्ता कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 92.41 टक्के, तर सूर्यदत्ता पब्लिक स्कुलचा निकाल 93.79 टक्के लागला आहे. सायन्स, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी व बायफोकल अशा सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, प्राचार्य किरण राव, शैला ओक यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले.
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “बारावी हा मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा टर्निंग पॉंईंट असतो. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वच परिश्रम घेतात. त्यांच्या परिश्रमांचे चीज झाले याचा मला मनापासून आनंद आहे. मुलांनी भविष्याच्या वाटा विचारपूर्वक निवडाव्यात. बारावीनंतर विद्यार्थ्यांनी इतरत्र कुठेही प्रवेश घेतला, तरी हे विद्यार्थी व पालक सूर्यदत्ता संस्थेशी कायम जोडलेले असतात. त्यांना हवे असलेले सर्व मार्गदर्शन सूर्यदत्तातर्फे केले जाते.’