धनकवडी : इयत्ता बारावी परीक्षेत चाटे कॉलेजसोबतच चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनीही अभूतपूर्व यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चाटे शिक्षण समूह पुणे विभागाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले व सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निरांत खराटे 95.50%, सिमरन नागवेकर 94.83%, घाडगे आदिती 94.83%, प्राची भोगे 93.50%, दीप्ती वसेकर 93.17%, शिवानी हेंगणे 93.17%, प्रीती जगताप 92.67%, श्रुती शिंदे 92.50%, शुभम मुंडे 92.33%, अभिजीत गंजुरे 92.00%, वैभवी नाले 92.00% अशा जवळपास 107 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत चाटे शिक्षण समूहाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली.
चाटे शिक्षण समूहाद्वारे सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राध्यापक चाटे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनो आपण घेतलेल्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आपले पालक यांचाही आपल्या या अभूतपूर्व यशामध्ये तितकाच सहभाग आहे. यापुढेही आपण आपल्या या यशाने हुरळून न जाता यापेक्षाही जास्त मेहनतीने पुढील नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत कराल याची आम्हास खात्री आहे.
चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी जे यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हे केवळ चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणालीमुळेच शक्य करता आले आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील 33 वर्षांपासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षमपणे व यशस्वीरित्या चालू आहे. यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. काटकर यांनी केले. यावेळी प्रा. बोबडे, प्रा. सोनवणे आदी उपस्थित होते.