नगर – करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्यातरी सरकारच्या आदेशानुसार केवळ ऑनलाइन अभ्यासक्रमच गरजेचा आहे. त्यामुळेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्याध्यक्ष छायाताई फिरेदिया यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन व्हिडीओद्वारे शिकवणी सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, अशी माहिती भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बेद्रे यांनी आज दिली.
भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे नुकताच व्हिडिओद्वारे अभ्यासक्रम शिकविण्यास प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. उपप्राचार्य नितीशा चावरे, पर्यवेक्षक भरतकुमार भालसिंग व गीतांजली भावे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक सत्रास प्रारंभ झाला.
प्रथम इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार करून अध्यापनाचे कामकाज करण्यास सुरु करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनीच विषयनिहाय स्वत: व्हिडिओ तयार केले आहेत, अशी माहिती प्राचार्य बेद्रे यांनी दिली.