पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यास मिळणार वाहतूक भत्ता

मुंबई : घरापासून जर तुमच्या मुलांची शाळा दुर असेल तर यापुढे मुलांना वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. मोफत आणि सक्‍तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या 2009 च्या अधिनियमा अंतर्गत हा भत्ता देण्यात येणार आहे. अर्थात याचा फायदा हा घरापासून शाळा दुर असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राज्यात ज्या गावांमध्ये किंवा वाड्या, वस्त्यांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा दूर असतील त्या गावातील विद्यार्थ्यांना हा वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक किमीपर्यंत तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन किमीपर्यंत जर शाळा जवळ नसतील तर त्यांना हा भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक भत्याच्या अनुषंगाने त्यांच्या राहत्या घराची माहिती प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे यांच्याकडे द्यायची आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.