मुंबई – राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे.
या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या “शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे बुधवारी (1 जून रोजी) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही परब यांनी केले आहे.
‘शिवाई’ची ठळक वैशिष्ट्ये –
-बसची लांबी 12 मीटर
-टू बाय टू आसन व्यवस्था
-एकूण 43 आसने
-ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी
-गाडी ताशी 80 किमी वेगाने धावणार
-बॅटरी क्षमता 322 के.व्ही.