पॅरिस – स्पेनचा कार्लोस अल्कारेझ गार्फियाने पुरुष एकेरीत, तर अमेरिकेच्या कोको गॉफ हिने महिला एकेरीत आपापले सामने जिंकत थाटात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अल्कारेझने रशियाच्या कॅरेन हाशनोव्हवर 6-1, 6-4, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. पुरुष एकेरीत त्यापूर्वी जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवने स्पेनच्या बेर्नाबे इपाटा मिरालेसवर 7-6, 7-5, 6-3 असा विजय मिळवला. महिलांच्या एकेरीत गॉफने बेल्जियमच्या एलिस मार्टिनचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
अन्य लढतींमध्ये कॅनडाच्या फर्नांडेझने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला 6-3, 4-6, 6-3 असे पराभूत केले. इटलीच्या ट्रेव्हिसान हिने आलिक्सांद्रा सान्सोव्हिचवर 7-6, 7-5 असा विजय मिळवला.
दरम्यान, भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला क्रोएशियाच्या इव्हान दोडीचसह खेळताना मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या बेएट्रिज माइआ आणि ब्रुनो सोआरेस जोडीकडून 4-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला.