गर्दी न करण्याचे आवाहन
पिंपरी – मूळगावी परतण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात गर्दी केली होती. उल्लेखनीय बाब अशी की सध्या “वायसीएम’मध्ये केवळ “करोना’ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु गावी जाण्याच्या ओढीने “करोना’चेही भय न बाळगता नागरिकांनी आज “वायसीएम’मध्ये देखील गर्दी केली. महापालिका प्रशासनाने नागरिकांना “वायसीएम’मध्ये गर्दी न करण्याचे आवाहन केले असून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी इतर दवाखान्यांमध्ये व्यवस्था केली आहे.
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे “करोना’साठी असल्याने इथे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. खालील दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
“अ’ क्षेत्रीय कार्यालय – आकुर्डी रुग्णालय, संभाजीनगर येथील साई अंब्रेला डिस्पेंसरी, दत्तनगर दवाखाना चिंचवड, इ.एस.आय रुग्णालय मोहननगर, भाटनगर दवाखाना भाटनगर पिंपरी, चिंचवड स्टेशन दवाखाना चिंचवड.
“ब’ क्षेत्रीय कार्यालय – काळेवाडी दवाखाना पोलीस चौकीसमोर, तालेरा रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना- दळवीनगर, बिजलीनगर दवाखाना, वाल्हेकरवाडी दवाखाना, किवळे दवाखाना मनपा शाळेजवळ,
“क’ क्षेत्रीय कार्यालय – नेहरुनगर दवाखाना मनपा गोडाउन जवळ, खराळवाडी दवाखाना बालभवन इमारत.
“ड’ क्षेत्रीय कार्यालय – पिंपळे गुरव दवाखाना मनपा शाळेजवळ, पिंपळे सौदागर दवाखाना, पुनावळे दवाखाना, पिंपळे निलख दवाखाना- औंध कॅम्प पुणे.
“इ’ क्षेत्रीय कार्यालय – भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, चऱ्होली दवाखाना, दिघी दवाखाना, बोपखेल दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय.
“फ’ क्षेत्रीय कार्यालय – घरकुल दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, तळवडे दवाखाना, प्राधिकरण दवाखाना- सिंधुनगर निगडी, म्हेत्रेवस्ती दवाखाना
“ग’ क्षेत्रीय कार्यालय – जिजामाता दवाखाना- जुन्या डिलक्स चौकाजवळ पिंपरी, पिंपरी वाघेरे दवाखाना-पिंपरी गाव, थेरगाव रुग्णालय-थेरगाव.
“ह’ क्षेत्रीय रुग्णालय – सांगवी रुग्णालय-जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, फुगेवाडी दवाखाना, जिल्हा रुग्णालय पुणे-औंध रोड सागंवी पुणे.
याठिकाणी फ्लू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी या ठिकाणी तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.