देशात कोरोनाचा थैमान; २४ तासांत तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाटयाने  वाढतच आहे. कारण मागील चोवीस तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला आहे. तर तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील ही सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 46 हजार 433 वर पोहचली आहे. यामध्ये 32 हजार 134 जणांवार सध्या उपचार सुरू आहेत. तर 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

गेल्या चोवीस तासांत करोनाचे 1,074 रुग्ण बरे झाले असून एकदिवसात बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 27.52 टक्के झाले आहे. एकूण 11,706  रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली. देशभरातील 20 शहरांमध्ये केंद्रीय पथके पाठवून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सहसचिव अगरवाल यांनी दिली. करोनाच्या महासाथीचे शिखर मे-जूनमध्ये गाठले जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.